अद्याप पूर्ण न झालेले तारण – १

आपण जाणतो की प्रभू पित्याने मानवांसाठी एक शाश्वत मुक्ती तयार केली आहे. ती कोणती मुक्ती आहे जी येशू ख्रिस्ताने आपल्या पहिल्या आगमनात आपल्याला दिली? ती मुक्ती संपूर्ण आहे का? या मुक्तीची पूर्णता काय आहे? ते ती कधी प्रदान करतील?

अद्याप पूर्ण न झालेले तारण – १

अद्याप पूर्ण न झालेले तारण – १

किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?....... सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणांला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असतां आपल्या ठायीं कण्हत आहों. (रोम. ७:२४; ८:२३)

आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहों. (फिलि. ३:२०)

त्याअर्थी ख्रिस्त 'पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी' एकदाच अर्पिला गेला; आणि जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. (इब्री. ९:२८)

ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेंतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेंतील शरीरासारखें व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. (फिलि. ३:२१)

I. प्रस्तावना

या लेखाचा उद्देश असा आहे की, जे लोक ओळखू शकतात की हा शेवटचा काळ आहे आणि येशू ख्रिस्तांच्या तेजस्वी प्रकटीकरणाची वेळ जवळ आली आहे, त्यांना या अंतिम काळात देव राबवत असलेल्या तारणाच्या योजनांची दिशा दाखवणे. हे विवेचन त्यांच्यासाठी आहे, जे मानतात की एकच खरा देव आहे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हेच एकमेव तारणहार आहेत, देवाचे वचन सत्य आहे.

येथे आपण तीन मुद्द्यांचा विचार करतो—तेही फक्त लिखित देववचनाच्या आधारावर.

पहिले: देवाने मनुष्यासाठी अनंत तारणाची तयारी केली आहे. पण येशू ख्रिस्तांनी आपल्या पहिल्या आगमनात तारणाची पूर्णता दिली का? या तारणाची पूर्णता काय आहे? आणि ती ते कधी देतील?

दुसरे: देव नेहमी मनुष्यांद्वारे कार्य करतात. हे तारण आधी प्रकट केल्याशिवाय आणि लोकांना त्यासाठी तयार केल्याशिवाय दिले जाऊ शकत नाही; आणि देवाकडून पाठविल्याशिवाय कोणीही प्रचार करू शकत नाही. अंतिम काळात देव हे करील अशी लेखी भविष्यवाणी आहे (१ पेत्र १:५). मग प्रश्न असे आहेत: हे तारण कोण प्रकट करील? ते कुठे जाहीर केले जाईल?

तिसरे: अंतिम काळात देवपुत्र तारण आणि दंड दोन्ही देण्यासाठी येतात . मग पृथ्वीवर कोण हे तारण प्राप्त करील? आणि ते कुठे प्राप्त होईल?

अ. तारण मिळालेले लोक

ख्रिस्ती विश्वास हा तारणारा आणि त्याने दिलेल्या तारणावर आधारलेला आहे. ख्रिस्ती ते आहेत जे मानतात की येशू ख्रिस्त हेच एकमेव तारणहार आहेत. आणि त्यांचा दुःखभोग, त्यांनी वाहिलेले रक्त, क्रूसावरील मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे आपले तारण झाले आहे. या तारणाचा अनुभवच ख्रिस्ती जीवनाला आकार देतो. म्हणूनच गेली २००० वर्षे ख्रिस्ती लोक तारणाची घोषणा करत आले आहेत.

बायबलमध्ये अनेक वचने सांगतात की ख्रिस्ताद्वारे आपले तारण झाले आहे.. उदाहरणार्थ:

कृपेने, विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे; हे तुमच्याद्वारे नाही, तर देवाची देणगी आहे. (इफि. २:८)

(पहा: रोम. १०:१०; १ करिं. १:२१; इफि २:५ इ.)

अनेकदा उद्धृत होणारे वचन असे आहे:

संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल …आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्यासोबत ही चिन्हे असतील:  ते माझ्या नावाने भुते काढतील; ते नवीन भाषांत बोलतील; ते आपल्या हातांनी साप उचलतील; आणि त्यांनी कोणतेही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी त्यांना इजा होणार नाही; ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.” (मार्क १६:१५–१८)

परंतु हे निर्विवाद सत्य आहे की या वचनात सांगितलेली सर्व चिन्हे आजपर्यंत “आपले तारण झाले आहे” असे म्हणणाऱ्या लोकांत पूर्णपणे दिसून येत नाहीत. देवाचे वचन सत्य आहे; म्हणून ते पूर्ण होणारच आहे. यावरून हे स्पष्ट होते की या वचनात सांगितलेले शुभवर्तमान अजूनपर्यंत पूर्णपणे प्रचारले गेलेले नाही; येथे सांगितलेला विश्वास अजून प्रकट झालेला नाही; (कारण विश्वास ऐकण्यामुळे प्राप्त होतो)  आणि या वचनात सांगितलेले तारण अजून कोणालाही प्राप्त झालेले नाही.

आता आपण देवाच्या  वचनातील आणखी एक वचन पाहूया. ते  आपल्याला देण्यात येणाऱ्या अनंत जीवनाविषयी येशू ख्रिस्त म्हणतात:

“मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे.तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे” (योहान ६:४७–५१)

अनंत जीवनाची भाकर मिळवण्यासाठी काम करण्याचा आग्रह करणारे येशू ख्रिस्त ह्यांनी हेही स्पष्टपणे घोषित केले की जो कोणी ही जीवनाची भाकर खातो तो कधीही मरणार नाही, तर तो सदासर्वकाळ जिवंत राहील. ( योहान ६:२७)

मनुष्य आजारामुळे, वृद्धापकाळातील गुंतागुंतींमुळे किंवा एखाद्या घातक अपघातामुळे मरण पावू शकतो. मग जर एखाद्या व्यक्तीला कधीही मरण येणार नसेल, तर त्याचे शरीर आजार, वार्धक्य आणि मृत्यू म्हणजेच एका शब्दात सांगायचे तर नश्वरता यांपासून कायमचे मुक्त झाले पाहिजे. येशूख्रिस्त म्हणाले की ते देतात ती भाकर जर आपण खाल्ली, तर असे घडेल हे जे अभिवचन त्यांनी  स्वतः आपल्याला दिले आहे ते सार्वकालीक जीवन होय. (१ योहान २:२५).

परंतु आजपर्यंत ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी त्यांनी दिलेली भाकर खाल्ली, त्यांपैकी कुणीही नश्वरतेवर विजय मिळवलेला नाही. सर्व लोक मरण पावले; सर्वांचा नाश झाला. आजपर्यंत कोणत्याही मानवाने अनंत जीवन प्राप्त केलेले नाही (इब्री ११:३९–४०). कारण येशू ख्रिस्त फक्त सत्यच बोलतात आणि ते स्वतःला नाकारू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे वचन पूर्ण झालेच पाहिजे. म्हणून हे स्पष्ट आहे की योहान ६:४७–५१ मध्ये वचन दिलेले अनंत जीवन (तारण) अद्याप कुणालाही प्राप्त झालेले नाही.

मग, ज्यांना ‘तारण मिळाले आहे’ असे म्हटले जाते, त्यांनी नेमके कोणते तारण प्राप्त केले आहे? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, येशू ख्रिस्ताने आपल्या पहिल्या आगमनात कोणते तारण दिले?

 

B. येशू ख्रिस्ताने दिलेले तारण

प्रेषित पेत्र पेंटेकॉस्टच्या दिवशी स्पष्ट करतो (प्रे. कृत्ये २:३७–३८): येशू ख्रिस्तांनी आपल्या दुःखभोग, रक्तस्राव व क्रूसावरील मृत्यूच्या द्वारे पापांचे प्रायश्चित्त केले. पश्चात्ताप करून, विश्वास ठेवून, ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यास पापक्षमा  व परिशुध्द आत्म्याची देणगी मिळते. हेच पहिल्या आगमनातील तारण आहे.

लोक मानतात की मुक्तिदात्याबद्दल केलेल्या भविष्यावाण्या येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतात. म्हणून त्यांनी येशु ख्रिस्तांना त्यांचा  देव व तारणहार म्हणून स्वीकारले. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना पापांच्या क्षमेची  कृपा मिळाली. ठीक आहे, ते मिळालेली मुक्ति आहे - पापांची क्षमा. त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे हे खरे आहे आणि आनंद आणि शांततेने त्यांचे हृदय भरले. देव परिशुध्द आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्या अंतःकरणापासून दुष्ट शक्तींना दूर फेकतो (मत्तय १२:२८). अशा प्रकारे देवाचे राज्य त्यांच्या अंतःकरणात सुरू झाले. हे देवाचे राज्य आहे जो विश्वास ठेवतो. त्यांच्या अंतःकरणात स्थापित झाले.(हे देवाचे पहिले राज्य आहे जे येशू ख्रिस्तांनी आम्हाला शिकवले आहे.) ही देवाची कृपा आणि देवाच्या राज्याचा अनुभव नाही का, की जो ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला , पृथ्वीवर राहणाऱ्यांना आता पर्यंत मिळाला आहे?

एक विश्वास  ठेवणारा ही कृपा न गमविता आणि देवाच्या वचनाचे साक्षीदार म्हणून जगतो, तर तो नक्कीच देवाच्या राज्याचा अनुभव घेऊनच मरेल. जेव्हा एखादी व्यक्ती यासारखे मरण पावते तेव्हा  ती देवाच्या राज्यातील उच्च स्थानी प्रवेश करते (अर्थातच, शरीराशिवाय). त्यालाच आम्ही स्वर्ग म्हणतो. हेच देवाचे दुसरे राज्य आहे ज्याविषयी येशू ख्रिस्ताने शिकवण दिली होती (मार्क ९: ४७-४८). यामुळे हे देवराज्य त्यांच्यासाठी आहे ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि परिशुद्धीमध्ये मृत्यू पावले.

(क्रमशः…)

Related Articles

प्रभूच्या मुलांची सर्वात मोठी जबाबदारी प्रभू पित्याची प्रतीक्षा करणे ही आहे. सुवार्ता हे घोषित करते की प्रभू पिता प्रकट होणार आहेत.

आपल्याला जी मुक्ती मिळाली ती संपूर्ण मुक्ती आहे का? येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून प्राप्त झालेली मुक्ती आणि त्यांच्या दुसऱ्या आगमनात त्यांच्याद्वारे प्राप्त होणारी मुक्ती प्रभूच्या वचनात विभाजित करून लिहिली आहे.

प्रभू पित्याने एका न्यायसंगत विधीची योजना केली आहे आणि प्रभू वचनाच्या माध्यमातून याबद्दल इशारा दिला आहे. पाहा, अंतिम न्यायविधीची वेळ आली आहे.

Chat with us